तोतया पोलीसांची ट्रक चालकास मारहाण कागदपत्र, पैशांची केली मागणी
जिल्हायातील वेग वेगळ्या ठिकाणी पारराज्यातुन आलेल्या माल वाहतुक करणार्या ट्रकांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग 211 क्रमांकावर दररोज गुजरात, पंजाब, हरियाना, दिल्ली तसेच आंध्रप्रदेश, तामीळनाडु, कर्नाटक अशा विविध राज्यातुन माल वाहतुक करणार्या लाब पल्ल्याच्या ट्रक सतत धवत असतात याचाच गैर फायदा घेण्याच्या अनेक घटना घडत आहेत. या कडे राज्य माहमार्ग पोलीसांचे कायम दुर्लक्ष होत आहे. यामुळे ट्रक लुटण्याचे प्रकार सातत्याने जिल्ह्यात घडत आहे. काल रात्रीच्या वेळी बेंगलोरहून बीड मार्ग औरंगाबाद कडे जाणार्या ट्रकला गेवराई परिसरात अडवून पोलीस असल्याची बातावणी करत पैशाची व कागदपत्राची मागणी करत मारहाण करण्याची घटना घडली.
बेंगलोरहून गेवराई मार्गे औरंगाबादकडे जाणारा ट्रक क्र.(के.ए.08 8234) हा रात्री शहराजवळील एका पेट्रोल पंपाजवळ आला असता पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघाजणांनी ट्रकला अडवलिे. पोलिस असल्याचे सांगत कागदपत्रांची मागणी केली. चालकाने विरोध करताच त्याच्याकडे पैशासाठी आग्रह धरला. मात्र चालकाने पैसे देण्यास नकार देताच तिघांनी चालकासह क्लिनरला बेल्टने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तिघेही फरार झाले असून चालकासह क्लिनरने पोलिस ठाण्यात धाव घेवून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पंचनामा करून ट्रकला बंदोबस्तात गेवराईच्या पुढे नेवून सोडले.
ही घटना गेवराई शहराजवळील पेट्रोल पंपाजवळ काल रात्री घडली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून ट्रकला गेवराईच्या पुढे नेवून सोडले. दरम्यान या पुर्वीही असे प्रकार घडलेले असून लुटमार करणार्यांचा कसलाच तपास होत नसल्याने पुन्हा-पुन्हा अशा घटना घडत आहेत. या कडे राज्य माहमार्ग पोलीस यंत्रणाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान परराज्यातुन आलेल्या ट्रकांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा मारहाण, लुटमार होवूनही तक्रार दाखल केली जात नाही.