Breaking News

नीलेश दिवटे गंगाई बाबाजी उत्कृष्ट निवेदक पुरस्काराने सन्मानित.


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत येथील पत्रकार नीलेश दिवटे यांना ग्रामीण भागातील पहिला राज्यस्तरीय गंगाई बाबाजी उत्कृष्ट निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच इतर बारा मान्यवरांना कला,क्रीडा,साहित्य,पत्रकारिता,सामाजिक,धार्मिक सह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श गंगाई -बाबाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रसिद्ध कवी व व्याख्याते नारायण सुमंत,माजी भाषा संचालक डॉ.मंजुषा कुलकर्णी,विवेकानंद शास्री,विठ्ठलराव बनसोडे,पोलीस उपाधीक्षक बजरंग बनसोडे,विजय वर्पे,हनुमंत थोरवे,कल्याण पोकळे,ईश्वर गव्हाणे,पंचायत समिती सदस्य डॉ.मनोज पाचे,डॉ.मधुसूदन खेडकर,शंकर देशमुख,उत्तम बोडखे,श्रीधरपंत सहस्रबुद्धे,संतोष चव्हाण रज्जुभैय्या शेख,सुभाष थोरवे आदी उपस्थित होते.