सायंटिस्ट ऑफ द फ्युचर " राष्ट्रीय स्पर्धेत तक्षशिला स्कुलचे विद्यार्थी प्रथम
बालाजी देडगाव /प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अग्नेय गुरुकुल अहमदनगर यांच्या वतीने आयोजीत सायंटिस्ट ऑफ द फ्युचर या राष्ट्रीय स्तरावरील रॉकेट्री व सैटलाइट डिझाइन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या शाळेचा विद्यार्थी राजवर्धन देशमुख याच्या नेतृत्वाखालील टीमने रॉकेट्री चॅलेंज या गटात हे यश मिळवले.
या स्पर्धेत विविध शाळेच्या एकूण १२२ टीम सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत राजवर्धन देशमुख सह दिया पटवा, श्रावणी देशमुख , रुद्रप्रताप देशमुख, दिव्या कदम, हर्षवर्धन कदम, अमृता चोरमले, साक्षी घोडके, वैष्णवी क्षिरसागर , श्रद्धा कुटे, सई कदम हे विद्यार्थी सहभागी झाले होते.स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा ड्रोन कॅमेरा , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. या विजयी टीमला इस्रो ची सहल मोफत करण्यात येईल असे स्पर्धेचे समन्वयक हेमंत केदार यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजयी झालेल्या स्पर्धकातून ग्रामीण भागातील शास्रज्ञ तयार होतील असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक प्रा. विजय कदम यांनी केले. या विद्यार्थ्यांचा शाळेचा वतीने गौरव करण्यात आला यावेळी विलास देशमुख, पत्रकार प्रल्हाद एडके उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना हेमंत केदार व सुनील लोटके यांनी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिले होते. स्पर्धकांना संचालिका शुभांगी कदम, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप तुपे, समन्वयक कल्पना पवार व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
