Breaking News

एव्हरेस्ट सर करताना इतकी अडचण आली नाही, जितकी महाकाल मंदिरात प्रवेश करताना आली !

उज्जैन : माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकविणारी जगातील पहिल्या दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हा हिला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिरात प्रवेश नाकारल्याचे समोर आले. देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या या मुलीला मंदिराचे कर्मचारी प्रवेशास मनाई करत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. 


अरुणिमानेही ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली. मला एव्हरेस्ट सर करताना इतकी अडचण आली नाही, जितकी महाकाल मंदिरात प्रवेश करताना आली,' असे ट्विट तिने केले. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अरुणिमाची माफी मागण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठविले. तर दुसरीकडे अरुणिमाने साडी नेसली नसल्यामुळे तिला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण मंदिर प्रशासनाकडून देण्यात आले आहे. भस्मारतीवेळी साडीतच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो, असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे