वृक्षारोपण करून सुशोभीकरण कामाचा प्रारंभ
नेवासा पंचायत समितीमध्ये कामानिमित्त शेकडो लोक येत असतात. मात्र त्यांना विसाव्यासाठी जागा असून ही सोय नसल्याने पंचायत समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये पंचायत समिती प्रांगण सुशोभीकरण करण्याची संकल्पना सभापती सौ.गडाख यांनी मांडली होती या संकल्पनेला अधिकारी ग्रामसेवक, सर्व विभागातील कर्मचारी यांनी साथ दिल्याने पंचायत समितीचे वैभव या सुशोभीकरणा मुळे फुलले आहे या सुशोभीकरणाद्वारे पंचायत समिती प्रांगणात उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे.यामध्ये लॉन टाकण्यात आले असून जॉगिंग ट्रॅक देखील तयार झाला.
सुरक्षेच्या दृष्टीने ग्रीलचे आकर्षक गेट यांचीही कामे पूर्ण झाली आहेत.बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी उद्यानात विसावा म्हणून आसन, बाकाची व्यवस्था करण्यात येणार आहे.मुलींच्या शिक्षणाच्या प्रचार व प्रसार व्हावा म्हणून पंचायत समिती प्रांगणात शालेय मुलींचे सहा फुटी शिल्प उभारण्यात येणार आहे उद्यानात सुमारे सात हजार क्युअर फूट लॉन तयार करण्यात आले आहे.