Breaking News

नगर रायझिंगच्या रनर्सचा औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग

नगर रायझिंग ग्रुपने मराठवाडा भागातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला-वेरुळ लेणी मार्गावरील सर्वात मोठ्या एम.आय.टी. औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. नगर रायझिंग ग्रुपच्या 30 सदस्यांनी 10, 21 व 25 कि.मी. ची अल्ट्रा हाफ मॅरेथॉन पुर्ण केली. 10 कि.मी. मध्ये महेश मुळे चौथ्या स्थानावर राहिले. 


अत्यंत उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत तीन हजार रनर्सनी सहभाग नोंदवला. यामध्ये राज्यासह देश, विदेशातील नामवंत धावपटू सहभागी झाले होते. पारंपारिक वाद्यांच्या गजराने या मॅरेथॉनमध्ये चैतन्य संचारला होता. या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता, पाणी वाचवा, मुलगी वाचवा आदि जनजागृतीचा संदेश दिला. तसेच यामध्ये अंध अपंग खेळाडूंनी देखील सहभाग नोंदवला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी मॅरेथॉन मधील रनर्सना टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले.
या मॅरेथॉनमध्ये नगर रायझिंगचे रनर्सनी 10 कि.मी. मध्ये संदिप जोशी, निलम पंडित, विद्या दाभाडे, योगेश गोडबोले, सुनिल देशमुख, गौतम जायभाय, श्याम तारडे, प्रसाद तनपुरे, रवी पठारे, ज्ञानेश कुलकर्णी, सागर वाघ, मृणाल वाघ, जमील शेख, आकाश भन्साळी, योगेश चुत्तर, गणेश पिंगळे, अमोल सायंबर, दादा घोडके, मारुती शेळके, अमृत पितळे, अमृत शेळके, डॉ.प्रदिप चोभे, अशोक बारगजे, अशोक धायगुडे, सिध्दांत कुमठ, 21 कि.मी. मध्ये योगेश खरपुडे, अंबादास हुलगे, चंद्रशेखर सावंत, 25 कि.मी. मध्ये विलास भोजणे यांनी अल्ट्रा हाफ मॅरेथॉन पुर्ण केली. वरील सर्व रनर्सनी अल्ट्रा हाफ मॅरेथॉन यशस्वी पुर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.