Breaking News

सलमान-लुलिया पुन्हा येणार एकत्र

दबंग अभिनेता सलमान खान आणि बार्बीडॉल कतरिना कैफ याचे 'टायगर जिंदा है' या आगामी सिनेमातील 'दिल दिया गल्ला' या गाण्याला प्रेक्षकांनी ऊत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या गाण्यातील या दोघांची केमेस्ट्री पाहता या दोघांमध्ये पुन्हा पॅचअप होण्याची शक्यता सिनेरसिकांना होती; परंतु नुकतेच सलमानने सर्वांच्या अपेक्षांचा भंग केला आहे. 


कारण, सलमान खान आणि त्याची प्रेयसी लुलिया वंतूर नुकतेच सोबत दुसऱ्यांदा सहलीसाठी रवाना झाली आहे. या दोघांना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. सलमान खान सध्या 'दा-बंग टूर'मध्ये व्यस्त आहे. लंडन, हाँगकाँग, मेलबर्न, ऑकलंडनंतर दा-बंग टूर दिल्लीकडे रवाना झाला आहे. सलमान दिल्लीवाल्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दबंग खानचा दा-बंग टूर नवीन वर्षात पहिले दिल्लीवासीयांचे मनोरंजन करणार आहे. १० डिसेंबरला दिल्लीमध्ये हे कॉन्सर्ट होणार आहे. 

हे कॉन्सर्ट दिल्लीमधील जवाहर लाल नेहरू मैदानामध्ये होणार आहे. या कॉन्सर्टमध्ये म्युझिक कंपोजर मीत ब्रदर्सच्या सोबत अभिनेत्री कृती सेनन सुद्धा स्टेजवर परफॉर्म करणार आहे. या मैदानात जवळपास ६५ हजार प्रेक्षक येण्याची अपेक्षा आहे. मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या फोटोत सलमानने काळ्या रंगाचे टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. तर लुलियाने लाईट चॉकलेटी टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती..