Breaking News

'भैय्या निरुपम वर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थरसे'

मनसे विरुद्ध संजय निरुपम वाद आता आणखी चिघळला. आज सकाळी काही अज्ञातांनी कॉंग्रेसचं कार्यालय फोडलं, मात्र नंतर हे कार्यालय आपण फोडल्याची जबाबदारी मनसेनं घेतली. त्याबाबतचं ट्वीटसुद्धा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेनी केलंय. 'भैय्या निरुपम वर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थरसे' असं ट्वीट यानंतर संदीप देशपांडेंनी केलं होतं. 


आझाद मैदान पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना दुपारी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर देशपांडे यांच्यासह आठही जणांना अटक करण्यात आली असून. संदीप देशपांडेसह 8 कार्यकर्त्यांवर या कार्यकर्त्यांवर दंगा करणे, ट्रेस पासिंग म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेत जबरदस्तीनं घुसणे, दुसऱ्यांची मालमत्तेची तोडफोड करणे, मुंबई पोलीस कायदा अशा अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.