Breaking News

क्रांती सेना तालुकाध्यक्षपदी शब्बीर शेख


कुळधरण/प्रतिनिधी/- क्रांती सेना शेतकरी आघाडीच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी दुरगाव येथील शब्बीर बाबासाहेब शेख यांची निवड झाली.प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे यांनी नुकतेच निवडीचे पत्र त्यांना सुपूर्द केले.

माजी आमदार डॉ.शालिनी पाटील यांच्या क्रांती सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत. शेख यांची निवड झाल्याबद्दल दुरगावमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष आल्ताब शेख,एमआयएमचे कर्जत तालुका उपाध्यक्ष मुबारक सय्यद,राष्ट्रवादीचे युवा नेते रवी भगत,टिपु सुलतान बिग्रेडचे अध्यक्ष आनिस शेख,जय भगवान महासंघाचे अध्यक्ष अभिजित जायभाय,अफसार शेख,इक्बाल शेख,साजन शेख आदी हजर होते.गाव तेथे शाखा व घर तेथे क्रांती सैनिक याप्रमाणे काम करण्याचा मनोदय शब्बीर शेख यांनी व्यक्त केला.