Breaking News

अविनाश कदम याची विद्यापीठ संघात निवड

बालाजी देडगांव/प्रतिनिधी/- मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय सोनईचा विद्यार्थी अविनाश कदम याने क्रीडा महोत्सव2017(अश्वमेध)च्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या मुलांच्या कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच मुलीच्या संघात अंजली काळे व पुजा भंडारे यांनी प्रतिनिधित्व केले.


विद्यापीठ कबड्डी संघ मार्गदर्शक म्हणून प्रा.संदीप तांबे यांनी काम पाहिले. या सर्व खेळाडूंना प्रा.संदीप तांबे व प्रा.राजेंद्र लिपणे यांचे मार्गदर्शन लाभले. अविनाश देडगांव येथील शिक्षक ज्ञानदेव कदम यांचा मुलगा आहे. या निवडीबद्दल खेळाडू व मार्गदर्शकाचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. हरी मोरे, विश्वस्त बाजीराव मुंगसे, कडुभाऊ तांबे, कारभारी चेडे,कुंडलिक कदम,पत्रकार बन्शी एडके, बप्पा कदम,देवी वस्ती युवा ग्रुप,माजी विद्यार्थी संघ आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.