Breaking News

टू-जी घोटाळ्यावर ए. राजांचे पुस्तक .

नवी दिल्ली : देशातील बहुचर्चित टू-जी घोटाळ्यावर माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल घोटाळ्यातील अनेक अज्ञात पैलू समोर येण्याची शक्यता आहे. या पुस्तकाचे २० जानेवारी रोजी प्रकाशन होऊ शकते. 


२०० हून अधिक पानांच्या पुस्तकात टू-जीसंबंधीच्या सर्व घटनांचे विवरण देण्यात आले आहे. या घोटाळ्यामुळे ए. राजा यांना १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला आहे. या घोटाळ्याच्या दोन प्रकरणांत दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने नुकतेच २१ डिसेंबर रोजी ए. राजा, द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. .