कुकडी आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना दिलासा ,फळबागा,रब्बी पिके ओलिताखाली
कुळधरण / प्रतिनिधी /- कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आवर्तनामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होत असुन शेततळे भरुन घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे कुळधरण येथील डीवाय १५ चारीला पाणी सुरु असुन त्याखालील कुळधरण, राक्षसवाडी, कोपर्डी आदी भागातील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी व्यस्त आहेत . सध्या शेतातील ज्वारी, कांदा, ऊस , हरभरा, कडवळ , मका आदी पिकांना आवर्तनाचा दिलासा मिळत आहे , येसवडी चारीला अजुन पाणी सुटण्याची प्रतीक्षा आहे . पाणी सुटताच या चारीवरील पिंपळवाडी, तळवडी, येसवडी, करमनवाडी या भागातील क्षेत्र भिजले जाणार आहे.
कुकडीचे आवर्तन उशिरा आल्याने अनेक भागातील ज्वारीची पिके जळुन गेली आहेत. बारडगाव, येसवडी भागात अनेक शेतकऱ्यांनी अर्धवट वाढलेल्या ज्वारीची काढणी केलेली आहे. जनावरांना चाऱ्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. आवर्तनामुळे टॉमटो, काकडी तसेच डाळींब, द्राक्षे आदी फळबागांना फायदा होत आहे . अनेक शेतकरी शेताजवळील नाले, बंधारे भरुन घेण्यासाठी धडपड करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी विहिरीतच आवर्तनाचे पाणी सोडुन पाण्याचा साठा करुन ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे. आवर्तनामुळे भुजलपातळीत वाढ होत असुन त्याचा पुढील दिड-दोन महिने फायदा होणार आहे.
आवर्तनाने विहिरी,कुपनलिकेला पाणी वाढते.सिंचनाच्या ठिबक तसेच तुषार पध्दतीचा वापर करुन या भागातील शेतकरी पिके काढतात.सुटलेले आवर्तनाचे पाणी किती दिवस राहणार ? हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. त्याप्रमाणे शेतकरी पाण्याचे नियोजन करीत असतात. क्षेत्रभेटीच्या नावाखाली अधिकारी आवर्तन काळात कार्यालयात थांबत नाहीत. कनिष्ठ कर्मचारी फक्त अंदाज व्यक्त करतात . त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडुन जाते. कुकडीचे अभियंता साठे यांना संपर्क केला. मात्र संपर्क न झाल्याने याबाबत आवर्तनाबाबत अधिक माहिती समजु शकली नाही