Breaking News

दिव्यांकाकडे गूड न्यूज

इशी माँ या नावाने घराघरात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या 'ये हैं मोहब्बते' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कलाकारांच्या रिअल आयुष्यांत काय चालले आहे, हे ऐकण्याची प्रेक्षकांना आवड असते. त्यामुळे नुकतेच इशिताप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे इशिता आई होणार असून ती 'ये हैं मोहब्बते' या मालिकेतून एक्झिट करणार आहे. 

या मालिकेत इशिताचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवले जाणार आहे. हे सर्व मालिकेच्या कथानकाप्रमाणेच दाखवले जाणार असले, तरी दिव्यांका प्रेग्नन्ट असल्याची माहिती मिळाली आहे. दिव्यांका आणि विवेक दाहिया यांची भेट 'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली. 

त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमेस्ट्री खूप चांगली असल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ८ जुलै रोजी विवेक आणि दिव्यांका विवाह बंधनात अडकले आणि आता दिव्यांका गूड न्यूज देणार असल्याची चर्चा आहे; परंतु दिव्यांका किंवा विवेक कडून अद्यापि याचा खुलासा करण्यात आला नाही..