Breaking News

नाशिकच्या उड्डाणाला 15 डिसेंबरचा मुहूर्त - खा. गोडसे


नाशिक : राज्यातील महत्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा निकाली निघाल्यानंतर आता नाशिक शहर दुसर्‍या टप्प्याच्या स्पर्धेत आले आहे.केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत दुसया टप्प्यातंर्गत नाशिक शहर आता देशभरातील सहा प्रमुख शहरांना जोडले जाणार आहे. या शहरामंध्ये हैदराबाद, बंगलोर, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद या शहरांचा समावेश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशभरातील प्रमुख शहरांसाठीची हवाई सफर आता थेट नाशिक शहरातून सुरू होणार असल्याने शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

लहान शहरांमधील विमानतळे मोठया शहरांमधील विमानतळांना जोडले जावे यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपुर्वी उडान योजना जाहिर केली होती. या योजनेतंर्गत नाशिक राज्यातील प्रमुख शहरांना जोडले जावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते.मुंबई विमानतळावर टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देत विमानसेवा कंपनी हवाई सेवा सुरू करत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार गोडसे यांनी दिल्लीतील नागरी उडान मंत्रालयाच्या समोर जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर शासनाने मुंबई विमानतळावर टाईम स्लॉट उपलब्ध करून दिला. यामुळे आता येत्या 15 डिसेबरपासून विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

विमानसेवा सुरू होणार असल्याने शासनाने नाशिक आरसीएस मधून वगळले. आरसीएस मधून नाशिक शहर वगळल्यामुळे पुढील काळातील परिणाम ओळखून प्रसंगावधान राखत खासदार गोडसे यांनी पुन्हा नागरी हवाई मंत्रालयाशी संपर्क साधला. नाशिक येथून राज्यातच नव्हे तर देशभरातील प्रमुख शहरांसाठी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्याशिवाय नाशिक आरसीएस मधून वगळू नये अशी मागणी लावून धरली. यासाठी गोडसे यांनी सतत दिल्ली वारी करत वांरवार नागरी हवाई उडान मंत्रालयाशी संपर्क साधला. यातूनच नाशिक शहर आता हवाई मार्गाच्या दुसर्‍या टप्प्याच्या स्पर्धेत आला आहे. यामुळे येत्या काही काळात नाशिक येथून हैदराबाद, बंगलोर, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद या देशभरातील प्रमुख शहरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.