Breaking News

मत्स्य शेतीमुळे शेतकर्यांची आर्थिक क्षमतेत वाढ डॉ. कोकाटे यांचे प्रतिपादन


राहुरी प्रतिनिधी - एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळते. मत्स्य शेती ही एकात्मिक शेती पध्दतीचा एक भाग आहे. पाण्याच्या शाश्वतीसाठी ज्या शेतकर्यांनी शेततळे केले आहेत. त्यामध्ये मत्स्य शेतीचा आंतरभाव केला तर शेतकर्यांना अधिकचे उत्पादन मिळून त्यांच्या आर्थिक क्षमतेत वाढ होईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम कार्यक्रमातंर्गत चिंचविहीरे आणि कनगर गावातील शेततळेधारक शेतकर्यांना मत्स्य बीज वाटपाचा कार्यक्रम संपंन्न झाला. यावेळी ते बोलत होते. संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, नियंत्रक विजय कोते, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. मधुकर धोंडे, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे, सरपंच शरद पानसंबळ, शेतकरी प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, आत्मा प्रकल्प उपसंचालक जगताप, गवळी, तालुका कृषि अधिकारी रोकडे, उपसरपंच संतोष पवार, शेतकरी शास्त्रज्ञ मंच अध्यक्ष भास्कर वरघुडे, माजी सरपंच दगडू गिते, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर झांबरे, ग्रामपंचायत सदस्य राजू नालकर, माजी सहाय्यक आयुक्त राजेंद्र डांगरे, कृषि अधिकारी रायभान गायकवाड उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख आणि आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनात श्री. विजय शेडगे, श्री. किरण मगर आणि श्री. अमोल गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमात शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.