Breaking News

शेअर बाजारांमध्ये अल्प घसरण


भारतीय शेअर बाजारांमध्ये बुधवारी अल्प घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स १५.८३ अंक घसरून ३३६०२.७६ पातळीवर बंद झाला. तसेच एनएसई निफ्टी ८.९५ अंक घसरून १०३६१.३० पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आणि स्मॉलकॅप निर्देशांकात बुधवारी नगण्य घसरण झाली, तर मिडकॅप निर्देशांकात मात्र ०.१७ टक्का घसरण झाली.

दिवसभरात मुंबई शेअर बाजारात एकूण २८५२ कंपन्यांच्या शेअरचे खरेदी-विक्री व्यवहार झाले. त्यापैकी १३४१ कंपन्यांच्या शेअरचे भाव वधारले, तर १३७६ कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले, तथापि १३५ कंपन्यांच्या शेअरचे भाव अचल राहिले. क्षेत्रीय निर्देशांकापैकी रियाल्टी निर्देशांकात बुधवारी ०.७० टक्का तेजी आली. त्याखालोखाल कंझ्युमर ज्युरेबल्स निर्देशांकात ०.५९ टक्का, तर कॅपिटल गुड्स निर्देशांकात पाव टक्का तेजी आली.