Breaking News

संत एकनाथ महाराज संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त लाहोटींचा राजीनामा

औरंगाबाद, दि. 30, नोव्हेंबर - गेल्या 12 वर्षापासून संत एकनाथ महाराज संस्थानमध्ये कार्यकारी विश्‍वस्त म्हणून कार्यरत असलेले नंदलाल लाहोटी यांनी कार्यकारी विश्‍वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भूमरे यांच्याकडे लाहोटी यांनी राजीनामा सादर केला आहे. संस्थानचे अध्यक्ष भुमरे यांच्याशी वाढलेल्या मतभेदामुळे लाहोटींनी राजीनाम्याचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. 


5 डिसेंबर रोजी नाथसंस्थान विश्‍वस्त मंडळाची बैठक आहे. या बैठकीत लाहोटी यांचा राजीनामा मंजूर केला जाणार, की फेटाळण्यात येणार याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे. आ. भुमरे सोडल्यास इतर सदस्यांचा हा राजीनामा स्वीकारण्यास विरोध कार्यकारी विश्‍वस्तपदी कार्य करताना नंदलाल लाहोटी यांनी नाथमंदिर व परिसराच्या विकास कामांसाठी सडेतोड भूमिका घेतली होती. लाहोटींनी या परिसराचा कायापालट करून दाखविला. त्यांच्या कारभाराला गत दोन वर्षात संस्थान अध्यक्ष, आ.भुमरेंनी लगाम लावायला सुरूवात केली होती. त्या संघर्षातूनच हा राजीनामा आला असल्याची चर्चा आहे.