Breaking News

उपसरपंच पाडूरंग आैटे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर


पैठण , दि. 29 (प्रतिनिधी) आपेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच पाडूरंग आैटे यांच्याविरूध् सरपंच रूपाली रामचंद्र आैटे, जया आैटे आदींसह ८ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसिलदारांकडे दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. यासाठी तहसिलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे अयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्वानूमते उपसरपंच पाडूरंग आैटे यांचे विरुध्द १०-१ असा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.

यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजुने सरपंच रूपाली आैटे, सदस्य जया आैटे, एकनाथ थोरात, सुनिल गंगावणे, सतिष वाघमारे, वर्षा थोरात, राधा कोल्हे, कविता विर, मुक्ताबाई मिसाळ, सुलाबाई प्रव्हाने यांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले. आपेगाव ग्रामपंचायत निवडणूक होऊन दोन वर्षे पूर्ण झाली होती. प्रशासनाच्यावतीने तहसिलदार सावंत यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुसिंगे, जमादार जावळे, दाभाडे, ग्रामसेवक गिरी, यांनी बंदोबस्त ठेवला. ठेवुन सहकार्य केले.

यावेळी कारखान्याचे संचालक प्रल्हाद आैटे, कांताबापु आैट, आण्णासाहेब आैटे, रामचंद्र आैटे, आप्पासाहेब आैटे, ज्ञानेश्वर थोरात, अशोक आैटे, प्रा. युवराज आैटे, संजय थोरात, संभाजी थोरात, बाबु पटेल, अण्णा ठेणगे, अमजद पठाण, प्रमोद आैटे, लहू आैटे, अंकुश आैटे, जिजा आैटे, भाऊसाहेब आैटे, जाकेर पटेल आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

दरम्यान, गेल्या २० वर्षासनपासून नेहमीच एकमेकांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादीचे आण्णासाहेब आैटे व सध्या भाजपात गेलेले प्रल्हाद आैटे आपेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच अविश्वास ठरावासाठी एकत्र आल्याने तालुक्यात आपेगाव ग्रामपंचायत अविश्वास ठराव चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे प्रल्हाद आैटे यांच्या साथीने उपसरपंचपदावरून पाय उतार झालेले पाडूरंग आैटे यांच्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सदस्यांनी सध्या तरी मौन पाळलेले दिसून येत आहेत.