Breaking News

महिला पोलिसाला आत्महत्येस प्रवृत्त करणारा पोलिसांच्या जाळ्यात


मुंबई : न्यू बीडीडी चाळीत राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. लग्नाला नकार देऊन मंजू गायकवाड या महिला पोलीस कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. .
मुकेश बोरके (२५) असे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या या तरुणाचे नाव आहे. चार वर्षांपासून मंजू गायकवाड व मुकेश यांच्यात प्रेमसंबंध होते. तसेच हे दोघे लग्नदेखील करणार होते. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी देखील या लग्नाला मंजुरी दिली होती. मात्र काही दिवसांपासून या दोघांत सातत्याने वाद सुरू होते.