Breaking News

पद्मावती प्रदर्शनाविरोधात 2 डिसेंबरला श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने निषेध फेरी

सांगली, दि. 30, नोव्हेंबर - संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपट प्रदर्शनाला श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र विरोध केला जाणार आहे. हा चित्रपट राज्यातील क ोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाऊ नये, यासाठी शनिवार 2 डिसेंबर रोजी श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने निषेध फेरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिव प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली.


सांगली शहरातील मारूती चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शनिवारी सकाळी दहा वाजता ही निषेध फेरी काढली जाणार आहे. पद्मावती या चित्रपटा विषयी हिंदू समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. समस्त समाजासमोर चुकीचा इतिहास ठेवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम या चित्रपटातून होणार आहे. भारतावर आक्रमण क रणा-या अल्लाऊद्दीन खिलजी याचे उदात्तीकरण या चित्रपटातून केले गेले आहे. इतिहासात अस्तित्वात नसलेले अल्लाऊद्दीन खिलजी व महाराणी पद्मावती यांचे प्रेमप्रकरण या चित्रपटात जाणीवपूर्वक घुसडण्यात आले आहे.

अल्लाऊद्दीन खिलजी याच्या हल्ल्यावेळी 30 हजार राजपूत महिलांसह राणी पद्मावती चितोडगडावर जोहार करीत अग्निच्या हवाली केले. मात्र या चित्रपटात हा खरा इतिहास लपविला गेला आहे. त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा हा चित्रपट राज्यात कोणत्याच चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये, यासाठी व संजय लीला भन्साळी यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवार 2 डिसेंबर रोजी ही निषेध फेरी काढण्यात येणार आहे. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी विजयकुमार क ाळम- पाटील यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही नितीन चौगुले यांनी सांगितले.