Breaking News

लाखाच्या कर्जाच्या चिंतेने तरूण शेतक-याची आत्महत्त्या

परभणी, दि. 24, ऑक्टोबर - परभणी जिल्हयातील पाथरी तालुक्यातील बाभळील 32 वर्षीय शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  त्याला 3 एकर जमीन होती व त्याच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचे 1 लाख 80 हजार इतके कर्ज होते. सदर शेतकरी हा उच्चशिक्षित होता. बाळासाहेब रणेर असे या तरूण शेतक-याचे  नाव आहे.