Breaking News

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नात्याला काळिमा

जळगाव, दि. 13, सप्टेंबर - जळगावातील जामोद तालुक्यातील बोराळा बुद्रुक येथे सावत्र बापाच्या अत्याचारास बळी पडलेली पीडित मुलगी गर्भवती असल्याचे  समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
बोराळा येथील पीडित मुलीच्या आईचे मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेड येथील अशोक नामक व्यक्तीशी दुसरे लग्न झाले होते. या महिलेला पहिल्या पतीपासून एक  मुलगी असून ती अल्पवयीन आहे. लग्नानंतर तिघेही तालखेड येथेच राहायचे. मात्र काही महिन्यांपासून ते बोराळा येथे राहण्यासाठी आले होते. आठ ते दहा  महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना सावत्र पित्याने तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने  पीडित मुलगी घाबरली व ही बाब तिने कुणालाच सांगितली नाही.
याचाच फायदा घेत आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करतच राहिला. परंतु त्या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता  डॉक्टरांनी तिला गर्भधारणा झाली असल्याचे सांगितले. हे ऐकून मुलीच्या आईला धक्काच बसला त्यामुळे तिने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध  तक्रार दाखल केली. आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.