Breaking News

पंकजा मुंडेंना दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर येण्यास प्रतिबंध

बीड, दि. 13, सप्टेंबर - महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळाव्यात येण्याची परवानगी याही वर्षी नाकारण्यात आली असल्याने  परत एकदा पंकजा विरूध्द भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात वाद उभे राहण्याची चिन्हे असून नुकतीच शास्त्री यांनी मेळाव्याच्या दृष्टीने पोलिस  अधिकार्‍यांसमवेत गडावर पाहणी केली आहे. 
30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने  भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे. या मुळं येथे राजकीय कार्यक्रम होवू नयेत किंवा राजकीय व्यक्तींनी 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्याचा  वापर करू नये अशा अशयाची भुमिका विश्‍वस्तांनी घेतल्याचे समजते.या पार्श्‍वभूमीवर शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे.
गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.यंदाही पंकजाला गडावर येण्याची  परवानगी नाकारल्याने गेल्या वर्षी प्रमाणे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. गेल्या वषीं दसरा मेळाव्यानंतर नामदेव शास्त्रींना धमकी देणार्यां ऑडिओ क्लिपमध्ये  पंकजा मुंडे म्हणत असल्याचे प्रसारित झाले होते. आता पंकजा कोणती भुमिका घेणार ?गेल्या वर्षा प्रमाणे गडाखाली मेळावा घेणार का याची चर्चा आहे.