Breaking News

सत्ता गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नैराश्यात - एकनाथ पवार

पुणे, दि. 13, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना नैराश्य आले आहे. भाजपच्या नगरसेवकांना काहीच समजत  नाही असे म्हणणा-या माजी महापौर मंगला कदम यांनी स्वपक्षाचे नगरसेवक एकत्र आहेत का? याचे आत्मपरीक्षण करावे, असे प्रत्युत्तर सभागृह नेते एकनाथ पवार  यांनी दिले.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर होऊन सहा महिने झाले. अजूनही भाजपचे नगरसेवक चाचपडत आहेत. प्रभाग समित्यांमध्ये बेकायदेशीर ठराव पारित  केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. भाजपच्या नवख्या नगरसेवकांना अज्ञातात ठेवण्याचे काम भाजपचेच पदाधिकारी करत असल्याचा आरोप,  राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्याला एकनाथ पवार यांनी प्रत्युतर दिले.सत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेकांची दुकानदारी  बंद झाली आहे.भाजपचे अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांची नाळ जनतेशी जोडली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे नगरसेवक जनतेच्या कामांना  प्राधान्य देवून ते सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे एकनाथ पवार म्हणाले.