Breaking News

मराठा आंदोलनात राणेंच्या राजकीय टीकेने कार्यकर्ते अस्वस्थ

औरंगाबाद, दि. 13, सप्टेंबर - मराठा आरक्षण आंदोलनाचे व्यासपीठ राजकीय हेतूकरता विरोधकांवर टीका करण्यासाठी वापरले जात असल्यामुळे मराठा  तरूणांमध्ये त्याबाबत तीव्र नाराजीची भावना पसरली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन कटाक्षाने राजकीय वादापासून दूर ठेवण्याची भाषा सुरूवातीपासून आयोजक  करत होते. अनेक ठिकाणी मोर्चा व कार्यक्रमात राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र औरंगाबादमध्ये या विषयावर भाषण करताना नितेश राणे यांनी  आपल्या भाषणात सर्रास राजकीय टीका करत राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबत मोठी नाराजी पसरली आहे. या आंदोलनातही आता  राजकारण घुसू लागल्याचे उघडपणे जाणवत असल्याचे मत अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 
या आंदोलनाचा भाग म्हणून मराठा आरक्षण या विषयावर नितेश राणे यांचे भाषण येथील तापडिय सभागृहात काल झाले. त्यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.  शिवाजी महाराजांच्या भगव्याच्या नावावर बंगले बांधणारे राम आणि श्याम कुठे दिसले नाहीत अशा शब्दात त्यांनी उद्धव व राज ठाकरेयांच्यावर टीका केली.
मराठा आरक्षण न्यायालयीन लढा’ या विषयावर बोलताना न्यायालयीन लढ्यापेक्षा राजकीय काटाकाटीवर बोलण्यारच त्यांनी भर दिला. या विषयावर सोमवारी (ता.  11) तापडीया नाट्यमंदिरात आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. राणे म्हणाले, की नारायण राणे यांनी  समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. मात्र, त्यात समाजकंटकांनी आडकाठी घातली. आपले राज्य आले की स्वराज काय असते, ते दाखवून देऊ, असेही त्यांनी  ठणकावून सांगितले.
मराठा मोर्चे आणि आंदोलनात सर्वच राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्ते व नेते राजकारण बाजुला ठेवून कोपर्डीच्या घटनेनंतर सहभागी झाले होते. मात्र कु ठेही  राजकीय टीका टीप्पणी न करता मराठा समाजाच्या प्रश्‍नांवर भर देण्यात आला होता. राजकीय ओळख असलेल्या नेत्यांना काही ठि काणी प्रवेशही नाकारण्यात आला  होता. आरक्षणात नारायण राणे यांची भूमिका असल्याने नितेश राणे यांनी न्यायालयीन लढ्याबाबत माहिती द्यावी असे अपेक्षित होते. मात्र आपली नेहमीची राजकीय  धुणी त्यांनी या भाषणात बाहेर काढल्याने राजकीय मतभेद असणारे पण मराठा आंदोलनात झटून काम करणारे कार्यकर्ते या राजकीय टीकेने अस्वस्थ झाल्याचे चित्र  आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ के. जी. भोसले , किशोर शितोळे यांची यावेळी भाषणे झाली. मराठा समाजाचे प्रश्  नसोडविण्यासाठी दबाव गट बनण्याऐवजी हे आंदोलन राजकीय फायद्याचे व्यासपीठ बनता कामा नये अशी भावना या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.