Breaking News

औरंगाबाद मध्ये महिन्यात 64 हजार 364 वाहन चालकांवर कारवाई

औरंगाबाद, दि. 13, सप्टेंबर - अवैध प्रवासी वाहतूक, विनाहेल्मेट याशिवाय वाहतूक नियम मोडणार्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.  गेल्या चार महिन्यात 64 हजार 364 वाहनांवर कारवाई करत एक कोटी 93 लाख तीन हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चार  महिन्यात फक्त 9 हजार विनाहेल्मेट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सी.डी. शेवगण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे  2017 ते 31 ऑगस्ट 2017 या दरम्यान
169 वाहनचालकांना अवैध प्रवासी वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 4 लाख 4 हजार 300
रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविणार्या 9523 केसेस करून 41 लाख 47 हजार 400 रुपये, राँग साइड जाणार्या 13  हजार 157 वाहनचालकांकडून 31 लाख 82 हजार 700 रुपये, भरधाव वाहने चालविणार्या 402 वाहनचालकांकडून 5 लाख सहा हजार 400 रुपये, मोटार वाहन  कायद्यांतर्गत 7 हजार 812 वाहनचालकांकडून 18 लाख 46 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.