Breaking News

बीडमध्ये महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड; नऊ जण अटकेत

बीड, दि. 08, ऑगस्ट - एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना वरंगळवाडी येथे घडली. या प्रकरणी नऊ अटक करण्यात आली आहे. सदर महिला  कुटंंबासोबत वरंगळवाडी येथे राहते. पीडितेच्या भावाचे आणि सटले कुटुंबातील मुलीचे प्रेमसंबंध जुळले. यासाठी तिने भावास मदत केली या संशयावरून तिच्या  आई-वडिलांनी 2 ऑगस्ट रोजी दुपारी तिला व तिच्या पतीला मारहाण केली होती. 
पीडितेचे पती परवा गावाबाहेर गेला असताना आठजण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी पीडित महिलेला विवस्त्र करून चावडीपर्यंत चपलांनी मारहाण करीत तिला  फरफटत नेले. पीडितेची सासू सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही ढकलून देण्यात आले. त्यांची मुले मोठमोठ्याने ओरडत होती, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले  नाही. शिवाय, सामूहिक अत्याचार करण्याची धमकीही तिला दिली. पीडितेचे पती घरी आल्यावर हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी चकलांबा पोलीस  ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मारोती रघुनाथ सटले, बबन रघुनाथ सटले, संजय आश्रुबा इंगोले, अंगद राम इंगोले, कुंता बबन इंगोले, लंका मारोती सटले, रेखा  संजय इंगोले, सुरेखा बबन इंगोले व झुंबर शहादेव दाताळ अशी आरोपींची नावे आहेत.