Breaking News

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - मराठा मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण मुंबईतील महापालिका आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सायन ते कुलाबापर्यंतच्या सर्व  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लाखो नागरिक या मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे या भागात होणार्‍या संभाव्य वाहतूक कोंडीमुळे शाळांना सुट्टी  देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आहे.
9 ऑगस्ट रोजी (उद्या) मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामातन ते आझाद मैदान असा  मोर्चा काढण्यात येणार आहे.