Breaking News

रामजन्मभूमी वाद : अयोध्येतील वादग्रस्त जागा सोडण्यास शिया वक्फ बोर्ड तयार

नवी दिल्ली, 09 . ऑगस्ट - अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील दावा सोडण्यासाठी शिया वक्फ बोर्ड तयार झाले असून, तसं प्रतिज्ञापत्रच त्यांनी सुप्रीम कोर्टात सादर केले आहे. मशीद मुस्लीमबहुल भागात बांधण्याचं आवाहनही शिया वक्फ बोर्डाने केले आहे. मशीद बांधणारा मीर बांकी शियापंथीय होता. त्यामुळे मशीदीवर शियांचा अधिकार असेल, सुन्नींचा मशिदीवर काहीच हक्क नाही, असेही शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्र म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात 11 ऑगस्टला दुपारी दोन वाजल्यापासून अयोध्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
शिया वक्फ बोर्ड अयोध्य खटल्यातील एक पक्ष आहे. या बोर्डच्या माहितीनुसार, 1946 पर्यंत बाबरी मशीद त्यांच्याकडे होती. इंग्रजांनी चुकीचे कायदे आणि  प्रक्रियेनुसार सुन्नी वक्फ बोर्डाला दिली. शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाला सूचवलं की, सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन  करावी. ज्यामध्ये हायकोर्टाचे दोन निवृत्त न्यायाधीश, पीएमओ, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि पक्षकार यांचा समावेश असावा. जेणेकरुन शांततापूर्ण मार्गाने  या प्रकरणात तोडगा निघेल.