Breaking News

दिल्लीत ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली, दि. 07 - राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला दिल्लीत सुरूवात झाली आहे. ओबीसींच्या प्रश्‍नांवर राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष  वेधण्यासाठी महाअधिवेशन बोलावण्यात आलं आहे. राज्य आणि केंद्रातले सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थिती लावणार आहेत.
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, अनंत गीते, खासदार नाना पटोले, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची उपस्थिती असेल. 7 ऑगस्ट  1990 या दिवशी देशात मंडल आयोग लागू झाला होता. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.