Breaking News

संपावरील धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाच्या नोटिसा

रत्नागिरी, दि. 08, ऑगस्ट - जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांनी धान्य व रॉकेल उचलणे बंद केले आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या सर्व दुकानदारांना  जिल्हा पुरवठा अधिकार्यांकनी नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्‍चिलत करण्यासाठी धान्य दुकानदार संघटनेने येत्या गुरुवारी (दि.  10 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व विभागप्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. ऐन उत्सवाच्या कालावधीत धान्य दुकानदारांचा संप सुरू झाल्याने ग्रामीण  भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 
जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागणंयासाठी गेल्या 1 ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 970 धान्य  दुकानदार सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे ऑगस्ट महिन्यातील धान्य आणि रॉकेलची उचल दुकानदारांनी केलेली नाही. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिनियम  तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत. कारवाईचा इशारा देत बंद मगे  घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. याबाबत राज्यस्तरावर आंदोलन सुरूच आहे. कारवाईच्या इशारानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रास्त धान्य  दुकानदार संघटनेची जिल्हा कमिटी, नऊ तालुक्यांतील कमिट्यांचे सदस्य व विभाग अध्यक्षांची बैठक येत्या गुरुवारी रत्नागिरीत आयोजित केली आहे. बैठकीस  संघटना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केले आहे.
ऑगस्टमध्ये अनेक सण येत आहेत. तसेच गणेशोत्सवालासही 25 पासून सुरवात होत आहे. त्यामुळे अंत्योदय व त्याखालील रेशनकार्डधारकांना धान्य उपलब्ध होत  नसल्याने, त्यांना मोठा फटका बसला आहे. गणेशोत्सवापूर्वी हा संप मिटावा, म्हणून प्रशासनाने नोटिसा दिल्या. तसेच संप मिटण्यासाठी हालचालीही सुरू केल्या  आहेत.