Breaking News

केंद्रीय राखीव पोलीस दलाची तेरावी तुकडी देशसेवेत रुजू

लातूर, दि. 07 - लातुरच्या मांजरा कारखाना परिसरात असणार्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात 170 जनावांची 13 वी तुकडी दिक्षांत सोहळ्यात  देशसेवेत रुजू झाली. या रोमहर्षक कार्यक्रमात जवानांनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली. 
निम लष्करी दल अशी ओळख असणार्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र लातूरच्या मांजरा कारखाना परिसरात आहे. येथून आजवर 12 तुकड्या प्रशिक्षण  घेवून देशसेवेत रुजू झाल्या आहेत. 13 व्या तुकडीच्या दिक्षांत सोहळ्यास केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा सीआरपीएफ पोलीस महानिरीक्षक  डॉ. डीके सिंह व मुख्य प्रशिक्षण अधिकारी आरटी वर्मा यांच्या उपस्थित होते
44 आठवड्यांच्या कालावधीत कठीण आणि कसरतीने परिपूर्ण अशा प्रशिक्षणात निपुण झालेले 170 जवानांना देशाला भेडसावणारे दहशतवाद, नक्षलवाद व परकिय  आक्रमणे अशा समस्यांना सडेतोड उत्तर देण्यास सक्षम बनण्यात आले आहे. या दरम्यान जवानांना विविध मापदंड आणि शिस्तींचे पालन करणे, कठीण व दुर्गम  भागात येणार्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवून राष्ट्रीय अखंडतेला बाधा पोहचविणार्या शक्तींचा कसा मुकाबला करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते.
या समारंभात पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रशिक्षणा दरम्यान विशेष प्राविण्य दाखविणार्या काही निवडक जवानांचा विशेष स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव केला  जातो. यामध्ये बेस्ट इन डोकर म्हणून शिपाफ जीडी संजीवकुमारसिंह, बेस्ट आऊटडोअर म्हणून शिपाई चालक अनिल कुमार, बेस्ट फायटर म्हणून जीडी मनोज  कुमार आणि ऑल राऊंडर म्हणून शिपाई जीडी विठ्ठल घायर यांना गौरविण्यात आले. यावेळी जवानांनी प्रात्यक्षिकांमध्ये मल्लखांब, जुडो-कराटे व अतिशय शिस्तबध्द  असे पथसंचलन व विलोभनिय अशी विविध रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली. याशिवाय सैन्याकडून वापरात येणार्या विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित  करण्यात आले होते.