Breaking News

वसमत बाजार समिती अविश्‍वास ठरावामुळे हिंसक वळण

हिंगोली, दि. 07 - हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्‍वास ठरावावर बोलावलेल्या  बैठकीपूर्वी प्रचंड गोंधळ उडाला. वाहनांवर दगडफेक करण्यात आली. मात्र तरीही या तणावाच्या वातावरणात अविश्‍वास ठराव नंतर मंजूर करण्यात आला. वसमत  बाजार समितीचे सभापती राजू पाटील नवघरे व उपसभापती तानाजी पाटील बेंडे यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल झाला होता.या प्रकरणी नवघरे यांच्या बाजुने  सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. विरोधातील सहलीला गेलेले सदस्य सभेकरता परत येत असताना त्यांना जमावाने अडवून प्रचंड दगडफेक केली. संचालकांना  मारहाणही करण्यात आली. अनेकजण शेतात लपून बसले.
यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अखेर बाजार समिती सदस्यांना जमावापासून संरक्षण देत पोलिसांनी सभास्थळी आणले. उपविभागीय  अधिकारी ज्ञानोबा बानापुरे हे पीठासीन अधिकारी होते. यावेळी अविश्‍वास ठराव बहुमताने पारित करण्यातआल. या एकूण घटनाक्रमर्चीं प्रभाकर इंगोले, अक्षय दळवी,  विनोद इंगोले, नितीन दळवी, नारायण लोकेवार, रामू धूत हे जखमी झाले. अविश्‍वास ठराव जरी मंजूर झाला असला तरी सामान्य शेतकरी व तरूणांच्या मनातील  विश्‍वास मी जिंकला आहे. असे सभापती नवघरे यावेळी म्हणाले.