Breaking News

शाडूच्या गणेशमूर्तीवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर!

कोल्हापूर, दि. 07 - जीएसटीचा फटका आपल्या लाडक्या बप्पालाही बसला होता. कारण शाडूच्या गणेश मूर्तीवर तब्बल 28 टक्के ॠडढ लावण्यात आला होता. हा  टॅक्स कमी करावा अशी मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. त्यासाठी पाठपुरावा करून हा टॅक्स 28 टक्क्यांवरुन 5  टक्क्यांपर्यंत कमी करण्यात त्यांना यश मिळालं आहे. देशभरात मूर्तीकारांना याचा फायदा होणार आहे.
गणेश उत्सव हा आनंदाचा उत्सव असतो. दरवर्षी या उत्सवाची आपण आतुरतोने वाट पहात असतो. गणेशमूर्तीना महागाईचा फटका तर दरवर्षी बसतोच. मात्र,  यावर्षी गणेशमूर्तींना ॠडढ चा फटका बसला होता. केवळ पश्‍चिम महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात तयार होणार्‍या शाडूच्या घरगुती गणपतीच्या मूर्तींवर तब्बल 28 टक्के ॠडढ  लावण्यात आला होता. हा टॅक्स रद्द करावा यासाठी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. काल दिल्ली इथं  झालेल्या ॠडढ कौन्सिलच्या मिटिंगमध्ये शाडूच्या गणेशमूर्तींवरील 28 टक्के ॠडढ हा कमी करुन तो  5 टक्के करण्यात आला आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रात तब्बल 6 ते 8 लाख शाडूच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात. तर महाराष्ट्र आणि देशात या अकडा किती होईल, याचा अंदाज यावरुन येईल. ॠडढ  मुळे घरगुती शाडूच्या गणेश मूर्तींवरील दरामध्ये अधिक 280 ते 300 रुपयांचा फरक पडणार होता. त्यामुळे सामान्य गणेशभक्त आणि मूर्तीकारही नाराज होते. गणेश  उत्सव हा सावर्जनिक उत्सव असून त्यावरील संपूर्ण ॠडढ रद्द व्हावा, अशी मागणीही होत आहे. मात्र तुर्त तरी शाडूच्या गणेश मूर्तींवरील ॠडढ कमी झाल्याने समाधान  व्यक्त होत आहे.