Breaking News

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्करात भरती होणार; शहीद जवानाच्या मुलाचा निर्धार

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करात भरती होणार असल्याचा निर्धार शहीद जवानाच्या मुलाने केला. अक्षय  कुमार असे या मुलाचे आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले शशी कुमार यांचा काल मृत्यू झाला होता. 
भारतीय लष्करात भरती होऊन पाकिस्तानला धडा शिकवणार. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अक्षयने लष्करात भरती होण्याचा निर्धार केला आहे.   नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात कुमार गंभीररित्या जखमी झाले होते. यानंतर त्यांना उधमपूर येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.