Breaking News

जेट एअरवेज वैमानिकांच्या वेतनात कपात करणार

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - जेट एअरवेज वैमानिकांच्या वेतनात 30 ते 50 टक्क्यांची कपात करणार असल्याचे वृत्त आहे. दैनंदिन खर्चात कपात करण्यासाठी हा  निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कनिष्ठ दर्जाच्या वैमानिकांच्या वेतनात मोठी घट होणार आहे. 
वेतनात होणा-या कपातीकरिता तयार राहा, अथवा नोकरी सोडा, असे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात कंपनीकडून महिन्याच्या सुरुवातीला वैमानिकांना पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात पगार कपातीच्या निर्णयाबाबत नमूद करण्यात आले होते.  यानिर्णायाचा फटका जवळपास 400 वैमानिकांना बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.