केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळात फेरबदल, सिसोदियांकडे पर्यटन मंत्रालयाचा अतिरिक्त भार
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल केला आहे . केजरीवाल यानी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवला आहे. मात्र सिसोदिया यांच्याकडून महसूल सारख्या महत्वाच्या खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे . महसूल बरोबरच सहकारी संस्था नोंदणी या खात्याचा कारभारही सिसोदिया यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे . परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांच्याकडे आता महसूल मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राजेंद्र गौतम यांना सहकारी संस्थांच्या सहकारी संस्था नोंदणी खात्याचा प्रभार देण्यात आला आहे. सिसोदिया यांनी आपल्याला काही खात्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती . त्यानुसार हा बदल करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गहलोत व गौतम यांचा मे महिन्यात कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला होता. सिसोदिया यांच्याकडून कायदे मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान व प्रशासकीय सुधारणा विभाग आदींचा प्रभार गहलोत यांच्याकडे सोपवण्यात आला.
गहलोत व गौतम यांचा मे महिन्यात कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला होता. सिसोदिया यांच्याकडून कायदे मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान व प्रशासकीय सुधारणा विभाग आदींचा प्रभार गहलोत यांच्याकडे सोपवण्यात आला.