20 रूपयांची नवी नोट लवकरच चलनात येणार
नवी दिल्ली, दि. 21, जुलै - भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 2005 च्या मालिके मधील 20 रूपयांची नवी नोट चलनात आणणार आहे . या नवीन 20 रूपयांच्या नोटेची रचना सध्या व्यवहारात असलेल्या 20 रूपयांच्या नोटेप्रमाणेच असणार आहे. सध्या चलनात असलेल्या 20 रूपयांच्या नोटाही व्यवहारात असतील, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.
20 रूपयांच्या या नव्या नोटेच्या पॅनलवर इंग्रजीतील एस हे अक्षर लिहिले असणार आहे. या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार असल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेने दिली.