Breaking News

विवाह मंडळ, पक्षकारांनी निबंधक कार्यालयाकडे विवाहाची नोंदणी करणे आवश्यक

अहमदनगर, दि. 16 - महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र  मंडळाचे विनियमन  आणि विवाह नोंदणी विभाग 1999  यास अनुसरुन  राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील  अस्तित्वात असलेल्या / येणा-या  विवाह मंडळांना सूचित करण्यात येते की,  विवाह मंडळ चालवू इंच्छिणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट किंवा  वधु-वर सूचक वेबसाईटस अशा विवाह  मंडळाची नोंदणी आपल्या कार्यक्षेत्रातील  निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी  यांचेकडे  नोंदविणे वैद्यानिक कलम 5(1) नुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे  विवाह नोंदणी देखील कलम 6(1)  नुसार विवाह  झालेला पक्षकार (वधू-वर) यांनी 3 साक्षीदारासह  वर किंवा वधु ज्या ठिकाणी राहतात, त्या कोणत्याही एका ठिकाणाच्या निबंधक विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी यांचेकडे व्यक्तीशः उपस्थित राहुन त्यांचे विवाह नोंदणी करावयाचे आहे. 
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र  मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी विभाग 1999 ची प्रत राज्य शासनाच्या  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या igrmaharashtra.gov.in  या वेबसाईटवर  उपलब्ध आहे.  विवाह  मंडळाच्या  नोंदणीची  नियमावली, अर्जाचा नमुने, भरावयाची फीस इत्यादी सविस्तर माहिती महाराष्ट्र विवाह  मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम 1999 मध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे.  विवाह  मंडळाची  व विवाहाची नोंदणी  विहित वेळेत केली नसल्यास, अधिनियमातील  कलम 12(2)  वैधानिक तरतूदीनुसार त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
विवाह मंडळ  चालविणार्‍या व्यक्तींनी त्यांचे विवाह  मंडळाची नोंदणी व पक्षकारांनी ( वधु-वर)   त्यांच्या विवाहाची नोंदणी संबधित क्षेत्रातील  निंबधक विवाह  मंडळ व विवाह  नोंदणी  यांचेकडे विना विलंब करुन घ्यावे तसेच  आपल्या कार्यक्षेत्रातील  निबंधक  विवाह मंडळ  व विवाह नोंदणी यांचेशी अपेक्षित कागदपत्रांसह संपर्क साधावा व नोदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.
कसूरदार  पक्षकार ( वधू-वर)  अथवा विवाह मंडळ यांचेवर विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह  नोंदणी अधिनियम 1998 मधील तरतूदीचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई होवू शकते याची नोंद घ्यावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी  जिल्हा परिषद अहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.