Breaking News

लष्करी टोळीतील फरारी चारजणांना केले पोलिसांनी तेलंगनात जेरबंद

अहमदनगर, दि. 16 - नेवासा येथील असिफ पटेल व अ‍ॅड. रियाज पठाण यांच्या खूनप्रकरणातील तसेच लष्करी टोळीतील दोघा फरारांसह चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तेलंगाना राज्यातील शंखरपल्ली तालुक्यात कारवाई करून टोळीचा प्रमुख सोपान गाडे, प्रविण खर्चन, सोनू पराड व अतुल कडू या चौघांना जेरबंद केले आहे. 
गुंड सोपान गाडे व खर्चन हे दोघे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले होते. खर्चन यास उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले असता दोन आठवड्यापूर्वी तो फरार झाला होता. तसेच त्याला फरार करण्यासाठी पराड याने मदत केली होती. तसेच अतुल कडू हा नेवासा येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तो वरील आरोपींबरोबर तेलंगना परिसरात राहत होता. या घटनेची माहीती कोतवालीचे सपोनि संदीप पाटील, एलसीबीचे योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, रवी सोनटक्के, योगेश सातपुते, बाळासाहेब भोपळे, महिला कर्मचारी दिपाली घोडके यांच्या पथकाने आरोपींची धरपकड केली. या पथकाला पोलिस अधिक्षक डॉ. त्रिपाठी, उपअधिक्षक पंडीत यांच्यासह एलसीबीचे  पोनि दिलीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले.