Breaking News

समिती सदस्य नियुक्तीविनाच मनपाची सभा संपली

। नव्याने तयार होणार प्रस्ताव

अहमदनगर, दि. 16 - नगर सचिवांनी गटनेत्यांना पत्र न दिल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली असून समदखान यांचे नगरसेवक पद अपात्रतेला स्थगिती मिळाल्याने त्याची कायदेशीर खातरजमा करून प्रशासनाने नव्याने तवलानीक संख्याबळाचा प्रस्ताव पुढील महासभेस सादर करावा, असा निर्णय देत सत्ताधारी सेनेने स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीची महासभा कायद्याचा आधार घेत नवीन समिती सदस्य निवडीविनाच संपवली.  तसेच विभागीय आयुक्तांकडे नोंद असलेल्या गटनेत्यांची बैठक आयुक्तांशी समन्वय ठेऊन नगरसचिवांनी बोलवावी, असा निर्णय पिठासन अधिकारी तथा महापौर सुरेखा कदम यांनी दिला. 
स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ तसेच महिला व बालकल्याण समितीच्या 16 सदस्य निवडीसाठी शनिवारी दुपारी महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. सभेच्या सुरूवातीसच राष्ट्रवादी शहर विकास आघाडीचे गटनेते समदखान यांच्या नगरसेवक अपात्रतेला न्यायालयाने स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. प्रशासनाने त्याची खातरजमा करावी, न्यायालयाच्या या आदेशाचे तवलानीक संख्याबळ बदलणार आहे. नगर सचिवाने नव्याने प्रस्ताव तयार करून त्यानंतर सभा बोलाविण्यात यावी.  दरम्यान सभेनंतर गटनेत्यांनी बंद पाकिटात सदस्यांची नावे दिली. महासभेत नवीन सदस्य नियुक्तीकरिता बंद पाकिटात महापौरांकडे नावे सुचविण्यात आली. सभा सुरू होताच सुवेंद्र गांधी, गणेश भोसले, मुदस्सर शेख, संपत बारस्कर यांनी सदस्यांची नावे दिली. सभा संपविल्यामुळे सचिन जाधव यांना मुदतवाढ मिळाली आहे. सचिन जाधव हे स्थायी समितीचे सभापती आहेत. नवीन सदस्य नियुक्त न झाल्यामुळे तेच सभापती म्हणून कामकाज पाहणार आहेत. यापूर्वी आघाडीची सत्ता काळात संजय गाडे अडीच वर्ष सभापती होते.