Breaking News

रोखविरहित व्यवहारांमध्ये अहमदनगर जिल्हा अग्रेसर - पालकमंत्री

अहमदनगर, दि. 16 - रोखविरहित व्यवहारामध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला पाहिजे, यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. 
नियोजन भवनात जिल्हास्तरीय डिजीधन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,  जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, महापालिकेचे आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राजेंद्र दायमा आदी उपस्थित होते. पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, हजार-पाचशेच्या नोटाबंदीनंतर देशात आर्थिक परिवर्तनाची लाट आली आहे. आधुनिक युगात वावरत असतांना परिवर्तन हे होतच असते. जनतेला कॅशलेस व्यवहारांच्या फायद्याबाबत जाणीव करुन दिली पाहिजे. कॅशलेस (रोखविरहित) व्यवहार हे पारदर्शी, जलद आणि सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.