Breaking News

संभाजी ब्रिगेड सार्वजनिक वाचनालय व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अहमदनगर, दि. 16 - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 190 व्या आणि विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून बहुजन समाजाच्या उत्क्रांती साठी, दुर्लक्षित व वंचित घटकांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्काच्या बाजूने लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सदाशिव होले यांच्या हस्ते दि. 14 एप्रिल 2017 रोजी करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडची श्रीगोंदा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद राऊत, संजय सोनवणे, नंदकुमार लाढाणे, जीवन मगर, शांताराम पोटे, यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
जिल्हासचिव टिळक भोस यावेळी म्हणाले की, संभाजी ब्रिगेड मुळ दरवर्षी मातृतिर्थ सिंधखेड राजा दरवर्षी लाखो लोक जिजाऊंच्या जन्मदिनी एकत्र येतात, लाखोंची पुस्तके, ग्रंथ खरेदी करतात, संभाजी ब्रिगेड च्या वैचारिक लढ्यामुळे दरवर्षी हजारो शिव-विवाह संपन्न होत आहेत. शिकलेला परिवर्तनवादी युवक याच कारणामुळे संभाजी ब्रिगेड कडे  आकर्षित होतो. शांत डोकयाने, विवेक, चिकित्सा आणि प्रामाणिक विचारधारा म्हणून संभाजी ब्रिगेडला जवळ करतो. त्यामुळेच खरा वैचारिक मावळा घडवण्याचे काम येत्या काळात श्रीगोंदा तालुक्यात करण्यात येणार आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी हे वाचनालय आणि संपर्क कार्यालय प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष कापसे यांनी श्रीगोंदा शहराची नूतन पदाधिकारी निवड जाहीर केली ती पुढीलप्रमाणे शहर उपाध्यक्ष ः अजीज शेख व गणेश पारे,  शहर संघटक ः शहाजी बेल्हेकर, तालुका संगटक ः युवराज चिखलठाने, महेश सप्रे या सर्व नवीन पदाधिकार्‍यांचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष चंद्रभान ठुबे, जिल्हासचिव टिळक भोस, तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, उपाध्यक्ष गोरख उंडे, कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत, शहराध्यक्ष सतीश बोरुडे, शहरसंघटक सुनील ढवळे यांनी अभिनंदन केले आहे.