Breaking News

अनुदान मिळण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

अहमदनगर, दि. 16 - ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आलेले अनुदान ताबडतोब वाटप करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून, जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, संदीप आल्हाट, प्रशांत उपाध्ये, विष्णू वाघ, संतोष लहासे, मारुती सावंत, सुनिल शिंदे, रोहित नेमाने, संजय डमाळ, शशीकांत साळवे, गोरख शिर्के, धनराज गजरमल, अंबिर तांबोली, नारायण पोटे, राहुल पोळ, भाऊराव भागवत, काकासाहेब निजवे, राजेंद्र देशमुख, संतोष लहासे आदि सहभागी झाले होते.
31 मार्च रोजी आकृतीबंधातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांचे मार्च 2017 पर्यंन्तचे अनुदान राज्य शासनाने जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग केले आहे. 14 दिवस उलटून देखील कर्मचार्‍यांना मागील सर्व थकीत पगाराची रक्कम अद्यापि मिळालेली नसल्याने, संतप्त कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांचे निवेदन जि.प. ग्रामपंचायत विभागाचे कार्यालयीन अधिक्षक भगवान गंडाळ यांना देण्यात आले. गंडाळ यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे अनुदान ऑनलाईन पध्दतीने जमा न होता. पुर्वीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी वर्ग होवून, पंधरा दिवसाच्या आत मिळणार असल्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.