पीएमपीएमएलसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा मानस - तुकाराम मुंढे
पुणे, दि. 30 - ओला आणि उबेर सारख्या कंपन्या तंत्रज्ञाचा वापरामुळे फायद्यात आहेत, त्यामुळे अशाच तंत्रज्ञानाचा वापर पीएमपीएमएलसाठी करण्यावर भर राहील. तसेच सेवा सुधारण्यासाठी चांगल्या उत्पनाची गरज असते, त्यामुळे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष ठेवले जाईल, असे तुकाराम मुंढे यांनी (बुधवारी) पुणे परिवहन प्रादेशिक महामंडळ (पीएमपीएमएल) च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई आयुक्त पदावरुन शुक्रवारी (दि.24) रोजी बदली झाली होती. त्यानंतर शनिवारी (दि.25) रोजी त्यांना पीएमपीएमएल संचालक पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार मुंढे यांनी आज दुपारी 2 वाजता पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे गेली नऊ ते दहा महिन्यांपासून रिक्त असलेले अध्यक्षपद आज भरले गेले आहे.
यावेळी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जायला आवडेल. तसेच प्रथमतः ब्रेक डाऊनची कारणे शोधून काढून मग पुढील नियोजन केले जाईल. त्याच प्रमाणे श्रीकर परदेशी यांच्या चांगल्या धोरणांचा गरज पडल्यास अवलंब केला जाईल. पुण्यात काही काळ शिक्षणासाठी वास्तव्यास होतो. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना पीएमटीचा प्रवास केला होता, अशा आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.
पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नऊ महिन्यांपूर्वी नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सुरुवातीला पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुण्यातील बदलीला नकार दिल्यामुळे मुंढे यांच्याकडे हा पदभार देण्यात आली आहे.