मुंबईतील मालाडमध्ये गॅस पाईपलाईन लीक, वाहतूक विस्कळीत
मुंबई, दि. 30 - मालाडमधील पुष्पा पार्कजवळ गॅस पाईपलाईन लीक झाल्याची घटना घडली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. गॅस पाईपलाईन लीकची घटना घडल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ऑबेरॉय मॉलजवळील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शिवाय, बोरिवलीकडे जाणारा मार्गही बंद झाला होता.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आता सुरु झाली आहे. मात्र, वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यास रात्र होईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. अंधेरीहून बोरिवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.