पुण्यात पारा 40.1 अंशावर; उकाड्याने पुणेकर हैराण
पुणे, दि. 30 - एप्रिल महिना सुरू होण्यास चारच दिवस शिल्लक असताना राज्यात सूर्याचे आग ओकणे सुरुच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पुणे शहरात सलग दुसर्या दिवशीही वाढलेल्या पा-याने मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. (सोमवार) 39.7 अंश असणारा पारा (मंगळवार) 40.1 अंशावर
पोहोचला. त्यामुळे अंगाची लाही-लाही करत भाजून काढणार्या उन्हामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाल्याचे चित्र आज सबंध शहरात होते. पुढील 2-3 दिवस पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या जवळपास राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. आज देखील पुणे शहरांचे कमाल तापमान 40 अंशाच्या वर नोंदविले गेल्याने नागरिकांना उन्हाचा चांगलाच चटका सहन करावा लागला. यामुळे पुणेकर चांगलेच घामाघूम झाले. उन्हाच्या
कडाक्यामुळे भरदुपारी पुण्यातील अनेक रस्त्यांवर चांगलाच शुकशुकाट जाणवला. हिंदू नववर्षानिमित्त बर्याच कार्यालयांना सुटी असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडता घरी राहणेच पसंत केले. जे नागरिक घराबाहेर पडले त्यांनी अंगाची लाही-लाही थांबविण्यासाठी शीतपेय घेण्याकडे धाव घेतल्याचे चित्र शहरात दिसत होते.