रामदास दांडगेंना प्रगतीशील शेतकरी पुरस्कार
बुलडाणा, दि. 24 - शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दहिद येथील रामदास दांडगे यांना आज 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन सोहळयात जिल्हा परिषद, कृषि विभागामार्फत आयोजीत सोहळयात सन्मानित करण्यात आले.
बुलडाणा तालुक्यातील दहिद बु. सारख्या खेड्यातील शेतकरी रामदास शेषराव दांडगे यांनी गावाहून 4 कि.मी. अंतरावर झरी शिवारात माळरानावर पडीत जमीनीवर समांतर चर खोदून सिताफळ, लिंबू, शेवगा फळझाडांची फळबाग फुलविली आहे. त्यांनी शेतक-यांसमोर आदर्श निर्माण केला त्याची जिल्हा परिषद कृषि विभाग प्रशासनाने दखल घेऊन त्यांना बुलडाणा जिल्ह्यांचा सन 2016 चा कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी पुरस्कार रु. 11 हजार व सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, केशरी आंब्याची कलम जि.प.अध्यक्ष अलकाताई खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंगदादा खेडेकर कृषी सभापती सुलोचनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, शरद पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी भराड, जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होेते. याचे श्रेय पत्नी, आईवडील, भाऊ तसेच कृषी सहाय्यक अरुण शेळके, कृषी विस्तार अधिकारी पुरुषोत्तम काकडे, संदीप सोनोने व कृषी अधिकारी पानझाडे यांना देतात.