Breaking News

पर्यावरण रक्षण व संरक्षणाचे काम महत्त्वाचे

अहमदनगर, दि. 04 - पर्यावरक्षण संरक्षणाचे मोठे संकट आज जगासमोर आहे. या संकटापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याशिवाय पुढे काहीही पर्याय नाही. कारण उपाययोजना केल्या नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम प्रत्येकास भोगावे लागणार आहेत. नवनियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांनी पर्यावरण रक्षणाचे व संरक्षणाचे कार्य चोखपणे पार पाडून या कार्यात इतरांना सहभागी करून घ्यावे. राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्था पर्यावरण रक्षणासाठी व मानवाच्या हक्कांसाठी काम करीत आहे. पर्यावरक्षणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेचे केंद्रीय निरीक्षक गजेंद्र राशीनकर यांनी केले.
राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी रेखा जरे व जिल्हा कार्याध्यक्षपदी रंजना उकिर्डे यांना नियुक्तीचे पत्र श्री. राशीनकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष इंजि. विनोद काकडे, डॉ. वि. की. तांदळे, डॉ. इम्रान शेख, म
च्छिंद्र वामन, साधना बोरुडे, ज्योती खराडे, सायली कुलकर्णी, सचिन काळे, स्वप्नील भोसले, किर्ती नगरकर, चिंतामणी, मृणाल जरे आदी उपस्थित होते.
 काकडे म्हणाले की, राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेचे कार्य देशभर सुरू आहे. नगर शहरात या संस्थेचे चांगल्या प्रकारे सुरू असून, शहराबरोबरच जिल्ह्यातही या संस्थेचे कार्य सुरू व्हावे, या उद्देशाने विविद नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी समाजामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. ही जागृती करण्याचे काम राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्था राष्ट्रीय स्तरावर करीत आहे. याबरोबरच मानवी हक्कांचे जतन व्हावे, यासाठी ही संस्था समाजकार्य करीत आहे, असे ते म्हणाले.