हिंसक आंदोलनानंतर अखेर दर्डानां अटक
नागपूर, दि. 04 - लैंगिक अत्याचारप्रकरणी यवतमाळ शहरातील नागरिकांनी आंदोलनाचा आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा यांना सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.
डॉ. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा आणि किशोर
दर्डा यांच्या अटकेच्या मागणीसाठी गेलो काही दिवस यवतमाळ शहरात नागरिकांनी शनिवारी व रविवारी केलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले होते. यांच्या अटकेच्या मागणीसाठी रविवारी संतप्त जनतेचा पुन्हा उद्रेक झाला होता. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी महिलांवर दगडफेक केल्याचा आरोप होत असून नागरिकांवर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या सात फैरी झाडल्याने जमाव भडकला होता.यात अनेक महिला, पत्रकार, आंदोलक जखमी झाले. आंदोलकांकडूनही दगडफेक करण्यात आली. काही नागरिकांना पोलिसांकडून अत्यंत निर्दयी मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांचे एक वाहन फोडले.
किशोर दर्डा घरी नसल्याचे कळल्यावर त्यांच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलाला त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे किशोर दर्डा यांना नागपूरमधून अटक करण्यात आली.किशोर दर्डा यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर सक्षम यंत्रणेला न कळविल्याबद्दल त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी दिली आहे.